सोलापूर

ॲड अमित आळंगे यांनी 851 मते घेत मारली बाजी, सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष पदी निवड

अध्यक्ष पदी ॲड अमित आळंगे तर सचिव पदी मनोज पामुल विजेते, सोमवारी 6 मे ला अधिकृत निकालाची होणार घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर बार असोसिएशन सोलापूर वार्षिक निवडणूक 2024-25 करिता मतमोजणी शांततेत झाली. एकूण झालेले मतदान 1597 आहे. 16 व्या अंतिम फेरीची मतमोजणी पुर्ण झाली आतापर्यंत मोजली गेलेली मते 1597 असून प्रत्येक उमेदवारास पडलेली मते पुढील प्रमाणे.

अध्यक्ष.

अमित आळंगे…851

राजेंद्र फताटे…152

एस.व्ही.उजळंबे…581

बाद मते…12

उपाध्यक्ष.

जयप्रकाश भंडारे…545

परवेज ढालायत…264

मल्लीनाथ मम्हाणे…95

विजय शिंदे…671

सचिव.

शामराव बिराजदार..301

मनोज पामुल…754

लक्ष्मण पाटील…525

सहसचिव.

मेघना मलपेद्दी…89

मिरा प्रसाद…650

निदा सैफन…677

सुवर्णा शिंदे…178

खजिनदार.

प्रकाश अभंगे…252

संतोष बाराचारे…229

मायप्पा गौडावनरू…43

विनयकुमार कटारे…643

शेख अब्दुल…411

आत्तापर्यंत 64 गठ्ठयाची मत मोजणी पूर्ण झाली असून मतमोजणीच्या प्रक्रियेला सकाळी ठीक 9.30 वा सुरूवात झाली तर या प्रक्रियेला तब्बल 13 तास लागले क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अंतिम कल हाती आला असून मतमोजणी रा.11 वाजता पूर्ण झाली.

महिला वकिलातील सामना आटीतटीचा व रंगतदार होता प्रत्येक टप्यावर हरकती घेतल्याने मतमोजणीस विलंब लागला. एकूण मतदार 1831 होते 87.17%.मतदानाची नोंद झाली. शेवटी लोकशाही मार्गाने निवडणूक पार पडली. वकिल संघाची उज्वल परंपरा अबाधित राखण्यासाठी काम करावे अशा शुभकामना दिल्या.

सोमवारी 6 मे ला अधिकृत निकालाची घोषणा होईल व‌ दु.2.वा विशेष सभेतून नूतन पदाधिकारी यांना पदभार सूपुर्त केला जाणार आहे.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी ॲड सुरेश गायकवाड, विशेष निवडणूक अधिकारी व्ही.सी.दरगड, सहाय्यक निवडणूक अधिकारी अविनाश काळे, अनिता रणशृंगारे, करण भोसले, सुनिल क्षीरसागर, अविनाश बिराजदार, रविराज सरवदे, संदिप शेंडगे, दादा जाधव, अजय रणशृंगारे, शिवाजी कांबळे, मोहन कुरापाटी, योगीराज कलबुर्मे, प्रथमेश शिंदे, युवराज अवताडे, विकास कुलकर्णी, भिमाशंकर कुत्ते, यांनी ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!