25 एकर रान पेटले, सलग दुसऱ्या दिवशी आग विझवण्याचे काम सुरू, धूर अन् दुर्गंधी मुळे परीसरातील नागरीक हैराण
पालिकेने काॅन्ट्रॅक दिलेल्या कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे वारंवारं आग लागते : स्थानिक नागरीक

सोलापूर : प्रतिनिधी
महापालिकेच्या तुळजापूर रोड कचरा डेपोला शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला आग लागली. आगीने ५२ एकरांपैकी २५ एकर परिसर व्यापला होता. तुळजापूर रोड, शेळगी परिसरात धूर, दुर्गंधीमुळे लोक वैतागले आहेत. उन्हाळ्यात आग लागण्याचे पाचवे वर्ष आहे.
महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे म्हणाले, कचरा डेपोला सायंकाळी पाचच्या सुमाराला आग लागल्याचा निरोप आला. कचरा डेपोवर अग्निशामक दलाचे गार्ड आणि जवान तैनात असतात. वाऱ्यामुळे आग पसरत गेली. आगीवर नियंत्रण आणण्यात जवानांना अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे रविवार पेठ, अक्कलकोट रोड एमआयडीसी, होटग रोडसह इतर केंद्रावरील गाड्या आणि जवानांना अलर्ट देण्यात आला. सुमारे १५ मिनिटात सर्व यंत्रणा डेपोवन पोहोचली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. रात्री आठपर्यंत २५ एकर परिसर पेटले होते. अग्निशामक दलाच्या वतीने आग विझण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महानगर पालिकेने काॅन्ट्रॅक दिलेल्या कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे वारंवारं या ठिकाणी आग लागते. या आगीतून निघणार्या धूर्याच्या लोटांमूळे आजूबाजूच्या लोकवस्त्या मध्ये राहणार्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. कचर्यामूळे दूर्गंधीतर पसरतेच पण या वारंवारं लागलेल्या आगीच्या धूरामुळे तेथील रहिवाशांच्या अरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.