आडम मास्तर यांचा 20 मुद्द्यांच्या जाहिरनामा, वाचा सविस्तर..

सोलापूर : प्रतिनिधी
भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्कवादीचे 249 सोलापूर शहर मध्ये चे अधिकृत उमेदवार नरसय्या आडम यांनी शनिवारी दत्तनगर येथील आपल्या कार्यालयात पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला.
कॉम्रेड मास्तर हे नेहमीच शेतकरी, असंघटित कामगार, कर्मचारी आदींच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करत सरकारला वेटीस धरताना आपण नेहमीच पाहत आलो आहे, यंदाच्या वेळी मात्र कॉम्रेड आडम मास्तर यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर, शनिवारी दत्त नगर येथील आपल्या कार्यालयातून लोकांना आव्हान करताना आडप मास्तर यांनी आपला जाहीरनामा सादर केला, आडम मास्तर यांच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे.
शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल, शहराला आणि हद्दवाढ भागात नियमित पाणीपुरवठा करण्यावर अधिक भर दिला जाईल, केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने झोपडपट्टी भागाचा सर्वांगीण विकास केला जाईल, शहरातील बंद पडलेल्या उद्योगांना चालना देण्यात येईल, शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सार्वजनिक वितरण प्रणालीवर अधिक लक्ष घालून अधिकाधिक लोकांना लाभ मिळवून देण्यात येतील, आरोग्य व वैद्यकीय सुविधा बरोबरच महिला सामाजिक सुरक्षेवर अधिक भर दिला जाईल, अशा एकूण 20 मुद्द्यांच्या जाहिरनामा माजी आमदार नरसय्या आडम यांनी जाहिर केला.