सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक

यशश्री शिंदे च्या मारेकऱ्याला संभाजी ब्रिगेड ने दिली प्रतीकात्मक फाशी, आरोपीला तात्काळ फाशी द्या अन्यथा..

सोलापूर : प्रतिनिधी

नवी मुंबई उरण येथील यशश्री शिंदे या युवतीवर अत्याचार करून तिच्या शरीराची विटंबना करणाऱ्या दाऊद शेख याला तात्काळ फाशी देण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागातील दत्त मंदिर येथे दाऊद शेख यांच्या प्रतिमेला जोडमार आंदोलन करून त्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला महिलांच्या हस्ते फाशी देण्यात आली.

यावेळी उपस्थित महिलांनी दाऊद शेख याला तात्काळ फाशी देण्यात यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना पैसे देण्यापेक्षा त्यांना तातडीने संरक्षण देण्यात यावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

यावेळी संभाजी ब्रिगेडची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, जिजाऊ ब्रिगेडच्या लता ढेरे, शुभांगी लचके, रेखा जाधव, आर्या लचके, सुरेश पाटील, दीपक जाधव, नितीन देवकते, राजू माने, श्रवण साळुंखे, रोहित साळुंखे, निलेश आवटे, सुमित माने, मोहन गोंडा,

दीपक जाधव, सुरेश पाटील, सिताराम कोरे, अविनाश रस्ते, विनायक मोती, युवराज ताकमोगे, रमेश भंडारे, मल्लिकार्जुन शेवगार, राजे चव्हाण, महेश भंडारे, रमेश चव्हाण, हनुमंत शरणार्थी, सोन्या गवळी, तेजस शेळके, रुपेश कुमार किरसावळगी, शेखर चौगुले, सिताराम बाबर, रमेश चव्हाण, लखन गायकवाड आदीसह महीला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!