
सोलापूर : प्रतिनिधी
जो राम को लाये है हम उन्हे लायेंगे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुनश्च एकदा पंतप्रधान करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना मतदान करण्याचे आवाहन हिंदू महासभेकडून करण्यात आले.
मशिदीमधून काँग्रेससाठी फतवे निघाले हिंदू महासभेने हिंदूंना जाहीर आवाहन केलं देव देश धर्मासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन रामभाऊ सातपुते यांना मतदान करा.
त्यासाठी एक पत्रक काढण्यात आलं होतं हे पत्रक बाळे, नवी पेठ, पार्क चौक, शहर वस्ती, शेळगी शहराचा अनेक भागात वाटप करण्यात आले.
यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड, सतीश आनंदकर, अभिजीत जाधव, रणजित मुळीक, अभी अडगळे, रणधीर स्वामी, ओंकार चव्हाण, अर्जुन मोहिते, निखिल क्षीरसागर आदींचे सहकार्य लाभले.