आरोग्यधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर

भजनानंदाचे सुख प्राप्ती साठी शरीर निरोगी हवे : ह.भ.प.इंगळे महाराज

सोलापूर : प्रतिनिधी

श्री हेडगेवार रक्त पेढी सोलापूर व श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग प्रशिक्षण संस्था संयुक्त विध्यमाने आरोग्य शिबीर संपन्न झाले आहे. वै.श्रीपती धर्मा जांभळे यांच्या ४३ व्या पुण्यस्मरणा निमित्ताने बळीराम जांभळे यांच्या निराळे वस्ती येथील निवासस्थानी धार्मिक कार्यक्रम सह सामाजिक उपक्रम घेण्यात आला. शिबिराचे उदघाटन ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांचे व डाॕ.विनायक टेंभुर्णीकर, बळीराम जांभळे महाराज, प्रकाशजी कुलकर्णी, मिलिंद फडके यांच्या हर्ते दिप प्रजवलन श्रीराम प्रतिमेचे पुजन करुन संपन्न झाले.

डाॕ केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी चे औचित्य साधुन डाॕ.हेडगेवार आरोग्य सेवा प्रकल्प अंतर्गत गरजु रुग्णांना मोफत तपासणी व औषधे देण्यात येतील अशी माहीती प्रकल्प प्रमुख डाॕ.टेंभुर्णीकर यांनी माहीती दिली. ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज याप्रसंगी म्हणाले, जीवनात मनुष्य सुख शोधत आसतो ते दोनच प्रकारे प्राप्त करता एक तर भजनात तल्लीन होउन त्या प्रभुचे नामस्मरण करणे आणि दुसरे म्हणजे आपले आरोग्य चांगले ठेवणे मग दुःख जवळ फिरकणार देखील नाही.

याप्रसंगी रंगनाथ जोशी, उत्कर्ष वैद्य, डाॕ.धिरज बिहाणी, डाॕ सारीका होमकर, श्री करपे, सुधाकर कुलकर्णी, संगिता कोरे उपस्थित होते. उदघाटना नंतर ह.भ.प.सुधाकर महाराज यांचे पुष्पवृष्टी चे किर्तन ही झाले. या शिबारामधे ४५ महिलांच्या व २० पुरुषांचे तसेच चाळीस मुले व मुलींची तपासणी सह औषधे देण्यात आली. या कार्यक्रमाचे सुञसंचलन बळीराम जांभळे यांनी केले. हा सोहळा पार पाडण्यासाठी आनिल शिंदे, आविराज जांभळे, तुकाराम लोखंडे यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!