क्राईममहाराष्ट्रसामाजिकसोलापूर
अथर्व जाधव याचा उपचारा दरम्यान मृत्यू, 7 ते 8 जणांनी मिळून मारल्याचा घरच्यांचा संशय, पुढील तपास विजापूर नाका पोलीस स्टेशन

सोलापूर : प्रतिनिधी
सुंदर नगर येथील रहिवासी अथर्व दिनेश जाधव वय 21 वर्षे याला सात ते आठ जणांनी मिळून रेणुका नगर बॉम्बे पार्क येथे मारहाण केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. या दरम्यान त्यास उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल केले होते उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती देण्यास कुटुंबाने नकार दिला.
अथर्व दिनेश जाधव याचा मोठा भाऊ देखील तीन वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दोन्ही मुले गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शुक्रवारी सायंकाळी अथर्व जाधव यास त्याच्याच सात ते आठ मित्रांनी मारहाण केली. याबाबत अधिक तपास विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस करत असून अधिकृत नोंद (FIR) झाल्यानंतर अधिक माहिती समोरील येईल.