जिल्हाधिकारी महोदय कंत्राटदारांच्या देयकांचा प्रश्न सोडवा, संघटनेचे ७ मे पासूनच काम बंद आंदोलन सुरू, संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील सर्व विभागांचे विकासाचे कामे करणाऱ्या कंत्राटदारांची देयके शासन देत नाही, यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने ७ मे पासूनच काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आज कंत्राटदार व अभियंत्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन कंत्राटदार व अभियंत्यांच्या व्यथा मांडल्या.
राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, सहसचिव कैलास लांडे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राज्य अध्यक्ष दत्तात्रय मुळे, बीएआयचे सोलापूर जिल्हा चेअरमन संतोष कलगुटगी, सचिव जी. के. देशमुख, अभियंता संघटना संचालक प्रमोद कुलाल यावेळी उपस्थित होते.
राज्य अध्यक्ष भोसले म्हणाले, या भेटीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शासनास स्वतःच्या कार्यालयाचे पत्र देण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विकासकामे बंद पडू नयेत, यासाठी आपण उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.