सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक
“कानून के हाथ लंबे होते है” याचा अनुभव फरदिसला आला, पोलीस आणि भाजप उमेदवारास शिवीगाळ केल्याची मागितली माफी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर विजापूर वेस याठिकाणी फरदीस सलीम शेख व त्यांच्या काही साथीदारांनी जल्लोष मिरवणुकीत सहभागी होऊन घोषणा देत होते. या घोषणेमध्ये त्यांनी भाजपाचे लोकसभा उमेदवार तथा आमदार राम सातपुते आणि पोलिस दलाला उद्देशून शिवीगाळ केली होती.
त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर पोलिस खऱ्या अर्थानं जागे होऊन त्यांनी तातडीने याबाबत सखोल चौकशी करून फरदीश सलीम शेख या युवकाला ताब्यात घेतले.
त्याला पोलिस काय करू शकतो, हे फरदीश सलीम शेख याला जाणीव करुन दिली. पोलिसानी दिलेल्या खातरजमा नंतर शेख यांनी पोलिस व समाजातील नागरिकांबद्दल माफी मागितली आहे.