
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली त्यावेळी शहरी भागातील मंगळवार बाजार येथील पालिका प्रशालेत असलेल्या मतदान केंद्रावर मतदार यादीतून नावे गायब असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मतदान केंद्रावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच वेळी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन झाल्या प्रकाराची माहिती घेतली मतदार यादीतून नाव गायब होन हे अत्यंत दुर्दैवी आहे अस म्हणत आमदार महोदयांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
शहरी भागातील मतदान केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या मतदार यादीतून मतदारांची नावे गायब झाली तर ते योग्य नाही प्रत्येक भारतीयांना मतदानाचा अधिकार आहे तो निभवण्याची संधी प्रशासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे पण निवडणूक निर्णय अधिकारी मात्र यावर कोणत्याही पर्याय काढण्यास तयार नाही संबंधित प्रकार अत्यंत गंभीर असून यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.