
सोलापूर : प्रतिनिधी
दि.२९.१०.२०२२ रोजी दुपारी फिर्यादी सविता सातलगाव व त्यांची मुलगी तसेच मोठी जाऊ व त्यांची सुन या पायी चालत कुमठेकर हॉस्पीटल च्या समोरून चालत जात असताना दत्त नगर जुळे सोलापूर येथून त्यांच्या घराच्या आलीकडे वय अंदाजे २२ ते २५ या वयाचे तरूणानी त्यांच्या समोरून वेगात येवून त्यांचे जवळ येऊन मोटार सायकलीवर मागे बसलेल्या तरूणाने त्यांच्या गळयातील गंठण हाताने हिसका मारून जबरदस्तीने चोरून नेले आहे म्हणून त्यांना दाखविल्यास ओळखू शकते असे म्हणूण त्या अनोळखी दोन तरूणांच्या विरूध्द विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेला आहे.
सदर गुन्हयात जबरी चोरी केलेले दोन इसम नामे आकाश जाधव व विजय पोसा यांना पोलीसांनी मिळालेल्या बातमीने पंचानामा करून अटक केले. चौकशी दरम्यान ते सोन्याचे गंठण विजय पोसा या आरोपींनी घोरपडी गाव पुणे येथे असलेल्या हरी ओम ज्वेलर्सचे मालक नवराज प्रजापत यांना सदर सोने आईचे आजार असल्याचे कारण सांगून सोने विकी केलेबाबत पोलीसांना सांगितले असता पोलीसांनी दि.०६.०५.२०२३ रोजी नवराज अदाजी प्रजापत रा. पुणे यांना पोलीसांनी अटक केली.
सदर गुन्हयाचा तपास माधव रेडडी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग २ यांचेमार्फत करण्यात आला. आरोपी नं. १ आकाश जाधव व आरोपी नं.२ विजय पोसा यांच्या विरूध्द वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये पाच गुन्हे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी भा. द. वि. संहिता ३९२, ४११, ३४ तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (२), ३ (२), व ३(४) अन्वये मे. कोर्टात दोषारोप पत्र सादर केले तर आरोपी नं. ३ नामे नवराज आदाजी प्रजापत यांनी चोरीचे सोने विकत घेतले असल्याचे आरोपावरून भा. द. वि. ४११ अन्वये दोषारोप सादर केले.
सदर खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधिश श्रीमती आर एन पांढरे मॅडम यांचे मकोका न्यायालयात चालविण्यात आले. सदर सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकुण साक्षीदार तपासले होते. सरकारी पक्षाने सोने हे चोरीचे असलेबाबत आरोपी नं. ३ यांना माहिती असल्याचे कोणताही पुरावा मे. कोर्टासमोर आणलेला नाही ४११ प्रमाणे गुन्हा सिध्द होत नाही असा त्यांमुळे आरोपी नं. ३ यांना भा.द.वि. कलम युक्तीवाद आरोपी नं. ३ यांच्या विधीज्ञ अॅड. एच.ए.साका यांनी मांडला. मा. विशेष न्यायाधिश मकोका न्यायालय यांनी दि.३.०५.२०२४ रोजी आरोपी नं. १ आकाश जाधव आरोपी नं. २ विजय पोसा यांना भा.द.वि. ३९२ व मकोका कायदयाप्रमाणे दोषी धरून त्यांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर आरोपी नं. ३ नवराज अदाजी प्रजापत यांचेविरूध्द सबळ पुरावा आढळूण न आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
सदरकामी आरोपी नं. ३ नवराज प्रजापत यांचेमार्फत ॲड हेमंतकुमार आनंद साका यांनी काम पाहिले तर सरकारमार्फत मकोका अॅक्टचे विशेष सरकारी वकिल ॲड शैलजा क्यातम यांनी काम पाहिले.