सोलापूर
श्री बसवेश्वरांचे विचार अंगीकारून युवकांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी : विजयकुमार देशमुख (आमदार, भाजप)
जगद्ज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांना अभिवादन, आमदार देशमुख मालकांसह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

सोलापूर : प्रतिनिधी
जगद्ज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त माजी राज्यमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहरांतील जगद्ज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाजयुमो अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की, माजी नगरसेवक अमर पुदाले, नागेश भोगडे, राजकुमार पाटील, राजशेखर बुरकुले, किसन गर्जे, शिवराज झुंजे, मोहन क्षीरसागर, विरेश उंबरजे, आशिष दुलंगे, छोटू गंजी, पृथ्वी खैरमोडे आदींसह बसवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.