ई-मेल पाठवून कंपनीला धमक्या, मॅनेजरवर गुन्हा दाखल, व्हॉट्स ॲपवरही आत्महत्येचा इशारा
मलाबार गोल्ड अँड डायमंड मधून गडगी याला निलंबित, सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
व्हाट्सअप ग्रुपवर व मेल पाठवून ई-मेलवर माहिती पाठवून कंपनीचा काळाबाजार उघडकीस आणतो, दुकानात जाऊन आत्महत्या करतो, त्यास कंपनी जबाबदार राहील अशा स्वरूपाची धमकी देणाऱ्या मलाबार गोल्ड अँड डायमंडस्चा असिस्टंट सेल्स मॅनेजर महेश गडगी याच्यावर सोलापुरातील सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापुरातील व्हीआयपी रोडवर असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंडस्मध्ये हा प्रकार घडला आहे. मलाबार कंपनीचे संचालक मुहमंद अनवर अब्दुल रहिमान पुतंगा थेरीईल (व्यवसाय मलाबार कंपनीचे संचालक, रा. सर्जन प्लाझा, लक्ष्मी रोड, कुमठे चौक, पुणे, मूळ रा. करिकुर्णी, जि. कोझिकोडे, राज्य केरळ) यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. असिस्टंट सेल्स मॅनेजर गडगी याने १५ डिसेंबर २०२३ रोजी एक लाख ३१ हजार ४१८ रुपये किमतीच्या २१.५३५ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या होम डिलिव्हरी देण्यासाठी घेऊन गेला होता.
या बांगड्या हरवल्याचा बहाणा करून या बांगड्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या प्रकरणी मलाबार गोल्ड अँड डायमंड मधून गडगी याला निलंबित करण्यात आले होते. गडगी याने व्हाट्सअप ग्रुपवर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना ४ मे २०२४ व १४ मे २०२४ रोजी व्हाट्सअप ग्रुपवर व मेल पाठवून कंपनीचा काळाबाजार उघडकीस आणतो अशी धमकी दिली. तसेच २० मे रोजी मलाबार गोल्ड अँड डायमंड दुकानात जाऊन आत्महत्याा करतो, त्यास कंपनी जबाबदार राहणार असल्याचीही धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.