महेश कोठे यांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागावी अन्यथा उत्तर मध्ये शिवसैनिक काम करणार नाहीत : पुरुषोत्तम बरडे

सोलापूर : प्रतिनिधी
महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हाप्रमुख असताना निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय केला जवळच्या आणि नातेवाईकांनाच महत्त्वाची पदे दिली स्वीकृत नगरसेवक केले.
महेश कोठे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे शहर मध्यची जागा काँग्रेसने जिंकल्याचा आरोप पुरुषोत्तम बरडे यांनी केला.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. महेश कोठे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागावी अन्यथा उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिक काम करणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेत पुरुषोत्तम बरडे यांनी दिला.
या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, प्रताप चव्हाण, विष्णू कारमपुरी, ॲड सुरेश गायकवाड, महेश धाराशिवकर, लहू गायकवाड, आबा सावंत, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.