स्वयंघोषित मुख्याध्यापकांन अपमानास्पद त्रास दिल्याची शिक्षिकेची तक्रार, सिद्धेश्वर पेठेतील बेगम कमरुनिस्सा शाळेतील प्रकार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील बेगम कमरुनिस्सा शाळेतील शिक्षिकेने आपल्याला शाळेच्या आवारातच अपमानास्पद तसेच मनास लज्जा वाटेल अशी वागणूक दिल्याची पोलीस आयुक्तां कडे तक्रार दिली आहे. मात्र या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अद्याप कारवाई होत नसल्याची खंत तिने आज नातेवाईकांसह पत्रकार परिषदेत येऊन व्यक्त केली.
बेगम करीमुनिस्सा गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्या. 1 डिसेंबर पासून आपल्याला संस्थेच्या चेअरमन यांनी प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार सांभाळण्याचा सांगितलं. हे काम आपण सुरू केल असताना शाळेत पानगल मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत असलेले हे शिक्षक आमच्या शाळेत आले. आपणच मुख्याध्यापक म्हणून बदलून आलो आहोत असं सांगू लागले. त्यांनी कार्यालयाचा ताबाही घेतला. माझी फाईल शिक्षणाधिकाऱ्यांकडे मंजुरी साठी अंतिम टप्प्यात असतानाही आपलं म्हणणं ऐकून न घेता, त्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली. ही बाब आपण संस्थाप्रमुख आणि शिक्षणाधिकारी यांनाही कळवली आहे. 15 मे रोजी संस्था प्रमुखांच्या आदेशावरून आपण शाळेतील स्टाफ रूम मध्ये ऍडमिशन करत असताना या शिक्षकांन तिथे येऊन तुम्हाला हे काम करायचा अधिकार नाही असं सांगत आपल्या हातातील कागद भिरकावली. आपला हात धरून ओढलं, ढकललं. आपल्याला मिळालेल्या या अपमानास्पद आणि लज्जस्पद वागणुकीच पोलिस आयुक्तांना भेटून त्याच दिवशी आपण निवेदन दिलं आहे.
त्यांनी हे निवेदन जेलरोड पोलिसांकडे पाठवलं, तिथे साधी तक्रार दाखल करून घेण्यात आली, पुढील कोणतीही कारवाई झाली नाही. एका शिक्षिकेला अशी अपमानास्पद वागणूक मिळाली असताना, तशी रीतसर तक्रार करूनही पोलीस आणि शिक्षण प्रशासन तसेच संस्थाप्रमुख बघ्याच्या भूमिकेत का घेत आहेत? असा सवाल ही या महिलेने आणि तिच्या नातेवाईकांनी केलाय.