4 दिवस घराबाहेर, भान हरपलेल्या 80 वर्षीय ज्येष्ठाची ओळख व्हायरल व्हिडीओने पटली.
आतिश कविता लक्ष्मण यांचे सामाजिक भान, अखेर पठाण बाबांना त्यांची मुलगी भेटली.

सोलापूर : प्रतिनिधी
वसंत विहार परिसरात काल रात्री 8:54 वा च्या दरम्यान ऋतुजा ढावरे व त्यांची बहिण हॉटेल उत्तरायण समोर वसंत विहार परिसरातून जात असताना एक ८० वर्षाचे वयोवृद्ध आजोबा फुटपाथ वर बेवारस अवस्थेत बसलेले दिसले. पावसाने भिजलेले, ओलेचिंब कपड्यात यांची चौकशी केली असता निदर्शनास आले की ते आजोबा गेले २ दिवस तिथंच बसून आहेत.
त्याच क्षणी घटनेची दखल घेत त्या आजोबांशी बोलण्याचा प्रयत्न केला, आजोबा थोडे घाबरून गेले होते त्यादरम्यान असे निदर्शनास आले की त्या आजोबांना डोळ्यांना दिसतही नाही व ऐकायला सुद्धा येत नाही, परिस्थीतिचे गांभीर्य घेत रुग्णवाहिकेची वाट न पाहत संभव फाउंडेशनच्या टिमने आजोबांना रिक्षाच्या साह्याने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
तिथून आजोबांच्या कुटुंबाचा शोध घेणे सुरू झाले, रात्रभर व्हायरल झालेला व्हिडीओ अखेरीस त्यांच्या मुली पर्यंत पोहोचला अन् चार दिवसांपासून हारवलेल्या वडिलांची ओळख पटली. जैनौदिन पठाण रा.हनुमान नगर असे बाबांचे नाव अखेरीस संभव फाउंडेशनच्या माध्यमातून वडिलांची आणि मुलीची भेट घडवून आणली गेली.
संभव फाउंडेशनचे प्रमुख आतिश कविता लक्ष्मण यांनी याहीपूर्वी अनेक मनोरुग्णांना मदत करत त्यांना आपल्या घरी सुखरूप पाठवले आहे. संभव फाउंडेशन आणि आतिश कविता लक्ष्मण यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्यास संस्था, संघटना, प्रतिष्ठान, उद्योजक, व्यापारी, आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदत करत सामाजिक भान राखावे. हीच मनोरुग्ण आणि जेष्ठ नागरिकांची इच्छा.