शालेय शिक्षण मंत्र्यांना पोस्टाद्वारे पाठवले पत्र, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती समाविष्ट करण्यास संभाजी ब्रिगेड चा तीव्र विरोध.

सोलापूर : प्रतिनिधी
राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू असून मनुस्मृती व मनाचे श्लोक यांचा अभ्यास क्रमात समावेश करण्याच्या प्रयत्न सुरू असून त्यास संभाजी ब्रिगेड ने तीव्र विरोध केला आहे. त्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्र पाठवून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे शाळा ह्या धर्मनिरपेक्ष विचारांच्या असल्या पाहिजेत अस्पृश्यता, भेदाभेद करणारी, स्त्रियांना हीन लेखणारी मनुस्मृती भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळली. त्याच मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात करणे हे कृत्य संविधानविरोधी व संतापजनक आहे.
महाराष्ट्राला जगतगुरू तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यासारखी महान संत परंपरा व प्रागतिक विचारधारा असतांना हा पेशवाई खटाटोप निंदनीय आहे. शालेय अभ्यास क्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान पराक्रमाचा शौर्याचा इतिहासाचा समावेश करावा तसेच लहानपणापासूनच शालेय विद्यार्थ्यांना आपली हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी म्हणून भारतीय राज्यघटनेचा संविधानाचा ही अभ्यासक्रमात समावेश व्हावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.
जर महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश केल्यास संभाजी ब्रिगेड च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी दिला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, संभाजी भोसले, अरविंद शेळके, सिताराम बाबर, सचिन शिरसागर, रुपेश शिरसावंगी, विजय बिल्लेगुरु, पिंटू पांढरे, अनिल माशा, विठ्ठल भोसले, रमेश चव्हाण, ओंकार कदम, दत्ता पवार आदी उपस्थित होते.