सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीय

माजी आमदार रमेश कदम, शरद कोळी यांच्यासह ७४ आरोपींना १ महिना कारावास व प्रत्येकी १ हजार दंडाची शिक्षा : ॲड प्रदीपसिंग राजपूत

यातील दोन आरोपी मयत असून सरकारी कामात अडथळा केलेचे प्रकरण.

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आय. ए. शेख मॅडम यांनी आजरोजी सरकारी कामात अडथळा निर्माण करणेचे प्रकरणात माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचे सह ४४ आरोपींना १ महिन्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १ हजार दंड ठोठावला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. ०४/०७/२०१५ रोजी शिवाजी चौक, मोहोळ व मोहोळ पोलीस ठाणे येथे माजी आमदार रमेश कदम व शरद कोळी सह इतर आरोपी यांनी मा. अप्पर जिल्ला दंडाधिकारी साहेब, सोलापूर यांचे जमावबंदीचे आदेश लागु असताना देखील आदेशाचे पालन न करता बेकायदा जमाव जमवून मोहोळ येथे शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करुन हायवेची जाळी तोडून सुमारे १,३२,५००/- रुपयांचे नुकसान केले व बेकायदा जमाव करुन मोहोळ पोलीस ठाणे येथे अटक होणेसाठी येवू नये असे पोलीसांनी कळवून देखील माजी आमदार रमेश कदम व त्यांचे कार्यकर्ते अटक होणेसाठी पोलीस ठाणेला येवून बंदोबस्ताकरीता असलेल्या पोलीसांना ढकलून दगडफेक केली व यात सामान्य नागरिक व पोलीसांना गंभीर जखमा केल्या म्हणून भा.द. वि. कलम ३५३, ३३२, ३३३, १४७, १४९, ४२७, ११७ इ. अन्वये मोहोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होणेसाठी सरकारतर्फे ए. पी. आय. सचिन म्हेत्रे यांनी फिर्याद दिली व तपास पोलीस निरीक्षक बंडगर यांनी केला.

सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीन १६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, तपासिक अमंलदार, वैद्यकीय अधिकारी तसेच शरद कोळी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल व व्हिडीओ ग्राफर यांची साक्ष तसेच आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेले व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफी है महत्वाचे ठरले. सदर प्रकरणाची विशेष बाब म्हणजे सदर प्रकरणात सरकार पक्षाचे ४ महत्वाचे साक्षीदार फितुर झाले होते, तरी देखील सरकार पक्षातर्फे प्रखर युक्तीवाद करण्यात आला व मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले. आरोपी हे आमदार व लोक प्रतिनीधी असूनसुध्दा त्यांनी सदरचा अपराध केल्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता. बेकायदा जमाव जमवून शासकीय मालमत्तेचे १,३२,५००/- रुपयांचे नुकसान करीत आहेत याची जाणीव असताना देखील व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा सदर आरोपीने अपराध केलेने व तो सरकार पक्षाने सिध्द केलेने आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली.

सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील श्रीमती कविता अरुण बागल यांनी काम पाहिले तर जिल्हा सरकारी वकील अॅड प्रदीपसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले. आरोपीचे वतीने अॅड श्री. मिलींद थोबडे, अॅड राज पाटील व अॅड सराटे यांनी काम पाहीले. कोर्ट पैरवी म्हणून पो. कॉ पवार व ए.एस.आय. रणदिवे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!