सोलापूरमहाराष्ट्रराजकीय
बाळराजे पाटिल यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या केल्या सूचना

सोलापूर : प्रतिनिधी (मोहोळ)
मोहोळ तालुक्यातील पापरी व येवती येथे मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यात पॉली हाऊस शेड, घराच्या पडझडची तसेच केळी पिकाच्या नुकसानीची पाहणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळराजे पाटिल यांनी केली.
यावेळी संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली व लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे सूचित केले.
यावेळी सतिश भोसले, शशिकांत पाटील, शिवाजी भोसले, रमेश टेकळे, सुरेश घागरे, बाबुराव भोसले, मधुकर गोडसे, शरद गोडसे, रामचंद्र खुर्द, मुन्ना पाटील, बालाजी खुर्द, संताजी गोडसे, ऋषिकेश पाटील आदी उपस्थित होते.