विद्या माने यांनी दाखवली माणुसकी, तृतीयपंथीयाचा अंत्यविधी करत केली विधी पूर्ण, सामाजिक कार्यातून सर्वत्र होतेय कौतुक

सोलापूर : प्रतिनिधी
संजना जोगती हा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पायाचा ऑपरेशन साठी आला होता त्याला तीन वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला संघटनेचे अध्यक्ष विद्याताई माने यांनी सांभाळत केला. त्याला शुगर व पायाचा ऑपरेशन झालं होतं त्याला वेळोवेळी जेवण राहण्याची सोय खाण्याची सोय कपडे सर्व त्याला विद्याताई माने स्वतः घरातील व्यक्तीप्रमाणे त्याला सांभाळत होते. परंतु 12 ऑक्टोंबर रोजी संजय जोगती यांचे निधन झाले.
यावेळी त्याची मदत करण्यास कोणीही तयार नव्हते त्याला कोणी बघण्यासही तयार नव्हते तृतीयपंथी असला म्हणजे त्यालाही जीव आहे तोही एक आपल्या सारखा माणूस आहे. स्वभावाचा समाजाने त्याला आपलं करून घेतलं पाहिजे असं मत विद्याताई माने यांनी व्यक्त केल. प्रत्येकाच्या बाबतीत वाटतं लोक हा विचार करत नाहीत पण मी त्याचे बेवारस मयत करत असताना मी त्यांना अडवले व त्याची मयत मी स्वतः जबाबदारी घेऊन केली त्याचे नातेवाईक व त्याचे गुरु कोण आहेत
हे कोणालाच माहीत नव्हतं पण अशावेळी मी सोलापूर मधील तृतीयपंथी लोकांना गोळा करून त्याची कुर्डूवाडी मध्ये माहिती काढण्यास सांगितले व त्याची सगळीकडे फोटो व त्याची माहिती व्हायरल करून खूप प्रयत्न केल्यानंतर त्याचा तपास लागला तृतीयपंथी जोगतीची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नव्हते पण मी स्वतः त्याला सांभाळल्यामुळे मला तुला बेवारस म्हणून मयत करायची नव्हती त्यामुळे मी खूप प्रयत्न केले त्यानंतर त्याचा तपास व त्याचे गुरु कुर्डूवाडी मध्ये आहेत असं समजल्यानंतर तेथील सर्व तृतीयपंथी लोकांना बोलावून घेण्यात आले व त्याची मयत करण्यात आली सर्व तृतीयपंथी लोकांना गोळा करून त्याची मयत रितीरिवादाप्रमाणे केली. अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई माने यांनी दिली.
15 ऑक्टोंबर रोजी मोदी स्मशानभूमीमध्ये त्याची मयत करण्यात आली व त्याचं तिसरा दिवस तसेच दहावा दिवस व त्यांचा व त्यांचे कुठले कुठले विधी असतात ते सर्व रितीरिवाचा प्रमाणे त्याचे मी सर्व शास्त्रविधीप्रमाणे माझ्या घरातील व्यक्तीप्रमाणे सर्व कार्यक्रम पार पाडणार आहे. प्रत्येकाने अशा व्यक्तींना मदत केली पाहिजे माया प्रेम दिलं पाहिजे हे लोक खूप प्रेमळ असतात मी या तृतीयपंथी कडून शिकले तो मला बहीण मानत होता माझ्या आईला आई म्हणत होता त्यांना प्रेम दिले जीव लावला तर ते लोक खूप जाणीव ठेवतात असे मत समाजसेविका सामाजिक कार्यकर्ता तथा महिला आघाडीचे अध्यक्ष विद्या माने यांनी मांडले.