“तीनवेळा प्रणितीताई, आता मात्र फक्त फिरदोसताई”, शहर मध्य उमेदवारीची सर्व धर्मीय महिलांनी केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
प्रत्येक क्षण समाजासाठी आणि प्रत्येक क्षण विकासासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन सार्वजनिक तसेच राजकीय जीवनात वाटचाल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या रूपाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून जनतेच्या आमदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्टींनीं जातीने लक्ष घालावे अशी मागणी आणि त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी सोलापुरातील सर्वधर्मीय महिलांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
तीनवेळा प्रणितीताई, आता मात्र फक्त फिरदोसताई असा नारा शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महिलांनी दिला आहे. देशातील एकमेव मुस्लिम महिला आमदार सोलापूरच्या जनतेमधून विधानसभेत पाठविण्यासाठी जनता सज्ज झाल्याचे महिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या पत्रकार परिषद मनिषा उडानशिव, आशा सदाफुले, रफत शेख, मुबरा उस्ताद, मुमताज गौर, परवीन शेख, नसरीन पठाण, डॉ. नुरजहाँ शेख, रुकय्या शेख, आफरीन जमादार, रुखसार तोळनुर आदी उपस्थित होते.