सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रसामाजिक

प्रणिती ताईंनी केले पृथ्वीराज नरोटे च्या सामाजिक कार्याचे कौतुक, आमदार प्रणिती शिंदेच्या हस्ते अहिल्यादेवींच्या 25 मूर्तीचे वाटप

रणरागिणी अहिल्यादेवी होळकरांनी चौकटीबाहेर जाऊन सर्वांसाठी काम केले : प्रणिती शिंदे

सोलापूर : प्रतिनिधी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती निमित्त युवा नेते पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाकरिता 25 मूर्तीचे वाटप आमदार प्रणिती शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल,

शिवसेना जिल्हाअध्यक्ष गणेश वानकर, माजी नगरसेवक सुरेश पाटील, विनोद भोसले, अशोक निंबर्गी, मनोज यलगुलवार, बाळासाहेब शेळके, संयोजक चेतन नरोटे, पृथ्वीराज नरोटे, मध्यवर्तीचे अध्यक्ष अमर हळली, सागर पिसे, जयवंत सलगर, माणिक नरोटे,

अक्षय वाकसे, अशोक देवकते, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे करण्यात आले. यावेळी मूर्ती घेण्यासाठी आलेल्या मंडळांनी आणलेल्या धनगरी गजी ढोल, ताश्या, हलग्याच्या आवाजाने, जय मल्हार च्या घोषणांनी परिसर धूमधुमुन गेला होता.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चेतन नरोटे, पृथ्वीराज नरोटे यांनी मूर्ती वाटप कार्यक्रम घेतला तो अतिशय चांगला उपक्रम आहे, अहिल्यादेवी होळकर यांचे विचार घराघरात पोचले पाहिजे. अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ माँ साहेब, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचे स्मरण केल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही.

 

रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांनी चौकटीबाहेर जाऊन समाजातील सगळ्यासांठी काम केले. पृथ्वीराज चेतन नरोटे यांना त्यांच्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा देते आणि सर्वाँना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा.

या कार्यक्रमास महादेव येरणाळ, रुपेश गायकवाड, संगप्पा म्याकल, महेश गाडेकर, विलास पाटील, आबा मेटकरी, मनीषा माने, गणपत कटरे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तिकोंडा, हणमंतू सायबोळू, जितू वाडेकर, दत्ता शिरगिरे, आनंद जमदाडे, गणेश माने, राजू पुठ्ठा, भारत सलगर, दिनेश भिसे, राजू येरणाल, पांडुरंग पुठ्ठा, आप्पा सलगर, विलास खांडेकर, अतीन चौरे,

 

विजू थोरात, संजय कदम, सन्नी पैलवान देवकते, आदर्श पुठ्ठा, अक्षय टेळे, आदित्य पुठ्ठा, शृंगार मेटकरी, इंद्रजित नरोटे, नागेश म्हेत्रे, सागर उबाळे, परशुराम सतारेवाले, लखन गायकवाड, संकेत माने, गणेश वड्डेपल्ली, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड, सुशीलकुमार म्हेत्रे, महेश वड्डेपल्ली, शिवशंकर अंजनालकर, बापू वाघमोडे, मनिष मेटकरी, नूर अहमद नालवर, शोभा बोबे, सुमन जाधव, शिल्पा चांदणे, प्रियांका गुंडला, अभिषेक अच्युगटला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!