महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, जेलरोड च्या पोलीस निरकीक्षांकडे मागणी : अनंत जाधव

सोलापूर : प्रतिनिधी
दुषित, गढुळ, मैला मिश्रीत काळ्या रंगाचे व जाणीवपूर्वक विषारी औषध टाकुन पिण्याचे पाणी सोडुन नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठा वस्ती, भवानी पेठ व सोलापूर शहरातील नागरिकांना उजनी धरणातुन तसेच हिप्परगा तलाव येथुन प्रत्येक आठवडयातुन एकदा महानगरपालिकेच्या अंतर्गत पाणी पुरवठा होत असतो. भवानी पेठ परिसरातील नागरिकांना खुप मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दुषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे जीवीतास धोका निर्माण झाला आहे. यापुर्वी देखील दुषित, गढुळ, मैला मिश्रीत काळ्या रंगाचे पिण्याचे पाणी सोडल्याने परिसरातील नागरिकांनी व माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती.
अधिकाऱ्यांनी स्वच्छ पाणी देण्याचे तसेच नागरिकांचे जीवीतास इजा पोहोचेल असे गढुळ पाणी अथवा विषारी पाणी देणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी कोणत्याही प्रकारे स्वच्छ पिण्याचे पाणी दिले नाही उलट नागरिकांच्या जिवीतास धोका पोहचविण्याच्या वाईट उदद्देशानेच मागील ७ ते ८ महिन्यापासून सतत दुषित, गढुळ, मैला मिश्रीत काळया रंगाचे पाणी देत आहेत.
२९ मे २०२४ रोजी अत्यंत घाण, दुषित, गढुळ, मैला मिश्रीत काळया रंगाचे व जाणीवपूर्वक विषारी औषध टाकुन पिण्याचे पाणी दिल्याने परिसरातील लहान मुले, वयोवृध्द नागरिक हे साथीच्या आजाराने त्रस्थ झाले आहेत. त्याच प्रमाणे खुप मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागत असल्याने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांचे विरूध्द फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होणे न्यायाचे दृष्टिने गरजेचे असल्याने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांनी २९ मे २०२४ रोजी अत्यंत घाण, दुषित, गढुळ, मैला मिश्रीत काळया रंगाचे व जाणीवपूर्वक विषारी औषध टाकुन पिण्याचे पाणी दिल्याने परिसरातील नागरिकांचे जिवीतास धोका पोहोचविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने भारतीय दंड संहिता कलम 328 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राजकुमार पाटील, संजय कोळी सचिन साळुंके, यातिराज पवार, सचिन बुरांडे, शुभम हूच्चे, आशिष हिंगमिरे, अक्षय सुरवसे, अत्तर नदाफ, जावेद शेख, अविनाश सूरवसे, नेताजी जाधव, ज्ञानेश्वर शिरसाट, अनिकेत शिंदे, बापू शेटे, सूरज भोसले, अजय वडतीले उपस्थित होते.