सोलापूरआरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

बिग ब्रेकिंग.. रविवार पेठेतील बोगस डॉक्टर वर कारवाई, पालिका आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

सोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या निर्देशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी बोगस डॉक्टरा विरूध्द तपासणी मोहिम घेण्यात आली आहे. २८ ऑगस्ट २०२४ रोजी सदर मोहिमे दरम्यान रात्री ८.३१ वाजता डॉ. राखी माने-आरोग्याधिकारी, सो.म.पा यांच्या पथकाने रविवार पेठ, सोलापूर येथील संजीवनी क्लिनीकची तपासणी करण्यात आली. सदर ठिकाणी राहुल नरसिंगराव रापर्ती हे डॉक्टर म्हणून क्लिनीक चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे प्राप्त वैद्यकिय प्रमाणपत्रा बाबत माहिती घेतली. त्यानुसार त्यांनी आवश्यक ती वैद्यकिय शैक्षणिक अर्हता पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र मेडिकल ट्रॅक्टीनर्स अॅक्ट १९६१ कलम ३३,३४,३५,३६ व ३८ अन्वये जेलरोड पोलीस ठाणे येथे डॉ. सचिन अलकुंटे वैद्यकिय अधिकारी, सोमपा यांनी २९ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा क्र.०३९२/२०२४ असा दाखल केलेला आहे.

सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टर शोध मोहिम आरोग्य विभागामार्फत कार्यरत करण्यात आलेली असून या करीता पथक गठित करण्यात आलेले आहे. सदर पथकामार्फत यापुढील कालावधीमध्ये बोगस डॉक्टर शोध मोहिम तीव्र गतीने करणेत येणार आहे.

शहरातील नागरीकांना आवाहान करण्यात येते की, त्यांनी वैद्यकिय उपचार घेताना संबंधित डॉक्टर वावत शहानिशा करून औषध उपचार घ्यावते. त्याचप्रमाणे ज्यांना बोगस डॉक्टर वैद्यकिय प्रॅक्टीस करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांनी सां.म.पा आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात संबंधितांचे नाव, ठिकाण इ. बाबतची माहिती कळविण्यात यावी. सदर माहितीनुसार संबंधितांवर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीनर्स अॅक्ट १९६१ अंतर्गत संबंधित पोलीस स्टेशनला तपासणी अंती गुन्हा दाखल करणेची कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!