मेघराज (विकी) रोडगे स्मृती चषक, विश्वजा देशमुख व अर्जुन सिंग अजिंक्य तर त्वेशा जैन व मेधांश पुजारी ला उपविजेतेपद

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे असोसिएशन व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने ड्रीम पॅलेस, पोलीस कल्याण केंद्र येथे सोलापूर येथे चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या मेघराज (विकी) रोडगे स्मृती एचटूई पॉवर सिस्टिम्स नऊ वर्षा खालील मुला मुलींच्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.
या स्पर्धा मेघराज (विकी) रोडगे त्यांच्या स्मरणार्थ अरुणदादा रोडगे यांनी पुरस्कृत केल्या होत्या. स्पर्धेचा बक्षीस समारंभ नामवंत उद्योजक भाऊसाहेब रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, उद्योजक दिनेश जाधव, संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, संतोष पाटील, सुभाष उपासे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांची नियुक्ती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने केली होती. त्यांना सोलापूरचे आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, राष्ट्रीय पंच उदय वगरे, राष्ट्रीय पंच पुण्याचे शशिकांत मक्तेदार, रोहिणी तुम्मा, राज्य पंच युवराज पोगुल, प्रशांत पिसे, विजय पगुडवाले, जयश्री कोंडा,भरत वडीशेरला, प्रज्वल कोरे, यश इंगळे, नागराज वडीशेरला यांनी सहकार्य केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात भाऊसाहेब रोडगे यांनी संघटनेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील यांनी केले. विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके, मेडल्स तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
स्विस् लीग पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धे च्या अंतिम आठव्या फेरीनंतर मुलांच्या गटात अग्रमानांकित मुंबईचा अर्जुन सिंगने आठ पैकी साडेसात गुण करून अजिंक्यपद पटकाविले त्याला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. दहावा मानांकित मुंबईचा मेघांश पुजारी, तृतीय मानांकित पुण्याचा राघव पावडे, अठरावा मानांकित अमरावतीचा ईशान लढ्ढा, बारावा मानांकित पुण्याचा शौर्य भोंडवे, चौदावा मानांकित मुंबईचा विहान पांडे व बिगरमानांकित कथित शेलार या सहा जणांचे समान साडेसहा गुण झाले होते. सरस बोकोल्स (४२.५) टायब्रेक गुणानुसार मेघांश पुजारीला उपविजेतेपद मिळाले त्याला रोख दीड हजार रुपये व चषक देऊन गौरविले. राघव पावडेने (४२) बोकोल्स गुणासह तृतीय स्थान मिळाले. ईशान लड्डा, शौर्य भोंडवे, विहान पांडे व कथीत शेलार ला अनुक्रमे चौथे, पाचवे, सहावे व सातवे स्थान मिळाले. सहा गुण मिळवणाऱ्या पुण्याच्या हेयान रेड्डी चा आठवा क्रमांक, सांगलीच्या वरद पाटील चा नववा क्रमांक तर ठाण्याच्या दर्श राऊत चा दहावा क्रमांक आला या सर्वांना रोख बक्षीस देऊन सन्मानित केले.
मुलींच्या गटात अंतिम आठव्या फेरीनंतर अग्रमानांकित मुंबईच्या त्वेशा जैन व सहावी मानांकित नागपूरच्या विश्वजा देशमुख या दोघींचे समान सात गुण झाले होते. सरस बखोल्झ टायब्रेक गुणांनुसार (41.5) विश्वजाने बाजी मारत अजिंक्यपद पटकाविले. तिला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. 36.5 बखोल्झ गुणामुळे अग्रमानांकित त्वेशाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्वेशाला दीड हजार रुपये व चषक देऊन गौरविले. साडेसहा गुण मिळवित मुंबईची थिया वागळे ने तृतीय स्थान पटकावले तर नागपूरच्या स्वरा गांधीने चौथे स्थान ग्रहण केले. सहा गुण मिळवणाऱ्या गिरीश पै ने पाचवा क्रमांक मिळवला तर मुंबईच्या अश्वी अगरवाल ने सहावा क्रमांक मिळवला. साडेपाच गुण मिळवणाऱ्या ठाण्याच्या कार्तिक उथारा चा सातवा क्रमांक मुंबईच्या स्वरा परेलकर चा आठवा क्रमांक, मुंबईच्या सन्मारी पॉल चा नववा क्रमांक तर पुण्याच्या अन्वी हिंगेचा दहावा क्रमांक आला. त्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.
पुणे येथे डिसेंबर मध्ये होणाऱ्या नऊ वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला महाराष्ट्राच्या पाच मुलांचा व दोन मुलींचा संघ पुढीलप्रमाणे
मुले :- 1) अर्जुन सिंग मुंबई 2) मेघांश पुजारी मुंबई 3) राघव पावडे पुणे 4) ईशान लढ्ढा अमरावती 5) शौर्य भोंडवे पुणे
मुली :- 1) विश्वजा देशमुख नागपूर 2) त्वेशा जैन मुंबई
उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे
सात वर्षाखालील उत्कृष्ट
मुले :- 1) कवीश भट्टड पुणे 2) अथर्व राज ढोले कोल्हापूर 3) आरव झवर मुंबई
मुली:- 1) संस्कृती जाधव सोलापूर 2) अक्षरा काळे औरंगाबाद 3) प्रियल शिखरे औरंगाबाद
उत्कृष्ट सोलापुरातील बुद्धिबळपटू
मुले :- 1) सिद्धांत कोठारी
2) श्रेयस कुदले 3) शशांक जमादार
मुली:- 1) पृथा ठोंबरे 2) मनस्वी क्षिरसागर 3) उत्कर्षा लोखंडे