IPL 2024 क्रिकेट सट्टावर पोलिसांची धाड, ३ आरोपींना शहर गुन्हे शाखेकडून अटक

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरामधील IPL-2024 क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या बुकीवर कारवाई करणेबाबत एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर, यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार, दिनांक 24/05/2024 रोजी रोजी सपोनि जीवन निरगुडे यांच्या पथकास गोपनीय बातमीदारमार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, सोलापूर मधील, अज्जो पान शॉपचे जवळ, शास्त्री नगर नाल्याचे शेजारी असलेल्या इमारतीमध्ये, IPL क्रिकेट मधील, सनराईजर्स हैद्राबाद विरुध्द राजस्थान रॉयल्स या दोन संघा दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये, बुकी, मोबाईल द्वारे सट्टा घेत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने, सदर ठिकाणी सपोनि/जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकाने, छापा टाकुन त्याठिकाणी IPL-2024 सट्टा चालविणारे तीन इसम नामे- (१) गफार शब्बीर हिरोली, वय ३६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा.अज्जो पान शॉप जवळ, सोलापूर, (२) नितीन प्रदिप शिंदे, वय-२८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा.घ.नं. १३६ शानदार चौक, शास्त्री नगर, सोलापूर, (३) यासर जावीद शेख, वय ३६ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा.घ.नं. १२३ सोमवार पेठ, आजोबा गणपती जवळ, सोलापूर सध्या रा.घ.नं. ६८ शेख यांचे घरात भाडयाने, बेगम पेठ, सोलापूर, यांना ताब्यात घेतले. नमूद आरोपींकडे, ते चालवित असलेल्या IPL-2024 सट्याकरीता वापरले जाणारे साहित्यामध्ये, विविध कंपन्यांचे मोबाईल, लॅपटॉप, टॅब, एक टि.व्ही., एक सेट टॉप बॉक्स, एक वाय-फाय राऊटर, इलेक्ट्रीक लाकडी बोर्ड असे एकुण 2,08,090/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याप्रमाणे, सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं.३८८/२०२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, त्याचा तपास गुन्हे शाखा, सोलापूर शहर करीत आहे. सदर गुन्ह्याचे तपासात, वर नमुद आरोपी इतर कोणत्या बुकींना सट्टा फिरवित होते त्याबाबत सखोल तपास चालु आहे.
सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे/वि.शा., प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, विजय वाळके, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे यांनी केली आहे.