सोलापूरक्राईममहाराष्ट्र

शहर गुन्हे शाखेकडून चोरीचे ०२ ट्रॅक्टर जप्त करत ४ आरोपींना अटक

सोलापूर : प्रतिनिधी

माहे जुलै २०२३ मध्ये, महसूल विभागाने, अवैध वाळूची वाहतूक करणारे ०२ ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून, उत्तर तहसील कार्यालय, सोलापूर येथे ठेवले होते. मात्र, रात्रीचे वेळी सदरचे दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी झाल्याने, त्याबाबत, सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं. ४६६/२०२३ भादंवि कलम ३७९, ३४, खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम कलम २२ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता.

त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडील पो.उप.नि./अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हे, सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना, त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, “इसम नामे संजय मनोहर गावडे व त्याचे साथीदार हे, उत्तर तहसील कार्यालय, सोलापूर येथून, माहे जुलै २०२३ मध्ये, ट्रॉलीसह चोरी केलेले दोन ट्रॅक्टर, विल्हेवाट लावण्याकरिता सी.एन.एस. हॉस्पीटल ते जुना पुना नाकाकडे जाणाऱ्या रोडलगत मोकळया मैदानात उभे आहेत.

प्राप्त माहितीचे आधारे, पो.उप.नि./अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाने, सापळा रचुन इसम नामे (१) संजय मनोहर गावडे, वय-३२ वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. मु.पो. पाथरी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, (२) आडप्पा शिवाप्पा कोळी, वय-३० वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मु.पो. तिन्हे, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, (३) अभिषेक उर्फ छकुल्या विश्वनाथ गायकवाड, वय-२३ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. मु.पो. तिन्हे, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, (४) आनंद उर्फ बिरु नामदेव गाडेकर, वय २१ वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर, रा.मु.पो. पाथरी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर यांना, दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले.

त्यानंतर, वरील नमूद चौघांकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता, यातील मुख्य आरोपी संजय मनोहहर गावडे याने, वरील नमूद साथीदारांसह मिळून, दि. ०२/०७/२०२३ रोजी रात्री १०.३० वा. चे सुमारास उत्तर तहसील कार्यालय, सोलापूर येथून, महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा व न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर, वरील आरोर्णीकडून सदर गुन्हयात चोरीस गेलेले, महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा व न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करणेत आले. तसेच, वर नमूद आरोपींनी, सदर गुन्हा करताना वापरलेली टाटा कंपनीची विस्टा कार, बुलेट मोटार सायकल असा एकूण रु. ९,९५,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, पो.उप.नि./अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दीक, बापू साठे, सैपन सय्यद, भारत पाटील, सुभाष मुंढे, वसिम शेख, धिरज सातपुते, आबासाहेब सावळे, सतिश काटे, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!