शिवजन्मोत्सव महामंडळाच्या नूतन वास्तूचे पूजन

सोलापूर : प्रतिनिधी
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नव्या वास्तूचे पूजन डाळिंबी आड इथे मोठ्या उत्साहात झाले. या नूतन इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापन करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधीश्वर मूर्ती बाहेर काढून स्वच्छ करण्यात आली. तसेच यामूर्तीत नव्या वास्तूमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. या नव्या वस्तूमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घेता येणार असून त्यासाठी वरच्या मजल्यावर अभ्यासिका तयार करण्यात येणार असल्याचे राजन जाधव यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे शिवाजी घाडगे, महामंडळाचे विश्वस्त पद्माकर काळे, विनोद भोसले, सुभाष पवार, भाऊसाहेब रोडगे, गणेश डोंगरे, रवी मोहिते, मतीन बागवान, तात्या वाघमोडे, देविदास घुले, प्रतापसिंह चौहान, श्रीकांत डांगे, माऊली पवार, राजू सुपाते, उज्ज्वल दीक्षित, विजय भुईटे, विजय पुकाळे, प्रीतम परदेशी, प्रकाश ननवरे, अनिकेत पिसे, सदाशिव पवार, संजय जाधव, जितू वाडेकर, विवेक फुटाणे, प्रसिध्दी प्रमुख वैभव गंगणे आदींसह शिवजन्मोत्सव महोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि शिवप्रेमी उपस्थित होते.