मुस्लिम समाज आणि MIM पक्षामुळे काँग्रेसचा विजय : रियाज खरादी

सोलापूर : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या सोलापुर लोकसभा राखीव मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजय उमेदवाराचा पराभव करीत दणदणीत विजयश्री खेचून आणला. या विजया मध्ये मुस्लिम समाज आणि MIM पक्षाचा सिंहाचा वाटा आहे.
या मतदार संघात एमआयएमने आपला उमेदवारच उभा केला नाही, मुस्लिम समाजाच्या वतीने आणि एमआयएम पक्षाने जर एखादा उमेदवार उभा केला असता तर जवळपास दीड ते दोन लाख मतं काँग्रेसला कमी मिळाली असती. ही सर्व मते मुस्लिम समाजाचा उमेदवार नसल्याने काँग्रेसला गेली त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे विजय होऊन खासदार झाल्या. आमदार प्रणिती शिंदे खासदार व्हाव्यात यासाठी MIM पक्षाने जिवाचे रान करून मतदान करून घेत प्रणिती शिंदे यांना निवडून आणले. असे मत माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी व्यक्त केले.
खरादी पुढे म्हणाले, समाजवादी विचारांची मत विभागणी टाळण्यासाठी एमआयएम ने काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे काँग्रेसचा विजय झाला. आता युतीचा धर्म पाळत काँग्रेसने शहर मध्य ची जागा एमआयएम ला सोडून मुस्लिम समाजातील आमदार व्हावा यासाठी सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. मुस्लिम समाजाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांना नेहमी झुकते माप दिले. आगामी विधानसभेत मध्य मधून MIM ला जागा सोडून त्याची परतफेड शिंदे कुटुंबियांनी करावी. अशी मागणी माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.