मनोज जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली, उपोषणावर जरांगे पाटील ठाम

सोलापूर : प्रतिनिधी (जालना)
मनोज जरांगे यांचे उपोषण शनिवारपासून सुरू होणार आहे पण, जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अंतरवली सराटी आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यास परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. याची दखल पोलिसांनी घेतली असून जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
जातीय सलोखा आणि शाळा-रहदारीला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलं आणि महिलांना त्रास होतो असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याने याला परवानगी देऊ नये. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतलीये. पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
सगे-सोयरे यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत. याआधीच त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचं ठरवलं होतं. पण, लोकसभेमध्ये राज्यात आचारसंहिता लागली असल्याने त्यांना आंदोलन करता आलं नाही. त्यांनी ८ जून रोजी उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती. सरकार मनोज जरांगे पाटील यांची कशी मनधरणी करतं हे पाहावं लागणारआहे.