छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्या समवेत पर्यावरणाची देखील शिकवणं दिली : अमोल शिंदे
शिवराज्याभिषेक दिन निमित्त शिवालय सामाजिक संघटनेच्या वतीने 350 देशी वृक्ष लागवड आणि जोपासना उपक्रम घेतला हाती

सोलापूर : प्रतिनिधी
शिवालय सामाजिक संघटनेच्या वतीने त्रिशतकोत्तरसुवर्ण शिवराजाभिषेकाच्या औचित्याने यंदाच्या पावसाळ्यात ३५० देशी वृक्ष लागवड आणि जोपासना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास फौजदार चावडीचे पोलिस स्टेशनचे निरीक्षक विकास देशमुख, पोलिस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात रोप देण्यात आले या प्रसंगी उपस्थित मावळ्यांना मार्गदर्शन केले. शिवरायांच्या जीवनात ढाल तलवारी, गनिमी काव्याला जितके महत्त्व आहे तेवढेच पर्यावरण संरक्षणाला देखील महत्व आहे. आरमारीच्या उभारणीत लाकडांची आवश्यकता होती तेव्हा एका आज्ञापत्रात नमुद केले आहे की, सुकलेल्या झाडांचा उपयोग करा. उपयुक्त झाडांची कत्तल करू नका. मोठी झाडे वर्षा दोन वर्षात वाढत नाहीत. झाड मालकांना योग्य मोबदला द्या. हीच शिकवण शिवालय संघटनेने हाती घेतली आहे असे मत अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी शशी थोरात, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, ॲड मोटे, शिवालय संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे, मोहन चटके, राज पुणेकर, सुरज पाटील, शिवानंद सोलापूरे, सुरेश रुपनर, विनोद शिंदे, महेश पवार, सागर चव्हाण, अमोल कामाने, घुले सरकार, हरिश सिध्दे, उमेश पोरे, स्वराज्य चव्हाण, शिव कलशेट्टी, अभिजित बिडवे, सुशील शास्त्री, साबीर शेख, प्रशांत बिराजदार, रोहन म्हमाणे, सिध्दू भुतनाळे, आकाश पुलसे, शशिकांत यादव, ॠतविक सुरवसे, संकेत पाटील, सागर कांबळे, शुभम निळ, सुरज वाजपेयी, युवराज माने, स्वप्निल कुलकर्णी, युवराज राऊत, विनायक मेंगाने, सचिन मग्रूमखाने, राजू घुले, अमोल राठोड, नंदेश्वर जगताप, हया सर्व शिवभ्तांनची उपस्थिती होती सगळ्यांच्या सहकार्यानी कार्यक्रम यशस्वी झाला.