वैशाख बुध्द पौर्णिमेचे औचित्य साधून आस्थाच्या वतीने अन्नदान, 275 गरजू सह सोलापुरातील आठ झोपडपट्टी मध्ये मोफत अन्नदान

सोलापूर : प्रतिनिधी
वैशाख महिन्यातील बुध्द पौर्णिमा ह्या दिवसच अनन्य साधारण महत्त्व तर आहेच शिवाय बौध्द धर्मासोबतच हिंदू धर्मात ही बुध्दपौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने रुढी पंरपंरा जपणा-यां श्रध्दाळु लोकसमुहास पुण्य संचित करायची ही तर पर्बनीच असते.
सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अर्थात सिव्हिल हाॕस्पिटल मध्ये उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या सोबती असलेल्या नातेवाईकांना पैश्या आभावी मन मारुन दिवस मोजावी लागतात. आजची वाढलेली महागाईमुळे किंवा मनुष्याची राहणीमान आरोग्य कड होत असलेले दुर्लक्ष परिणामी दीर्घ व महागडया रोगांना बळी पडलेले पिडीत दररोजच्या जेवणासाठी ही झुंज झेलणा-या लोकसमुह उपचाराकरिता येतात. त्यांच्यासाठी असता बँकेच्या वतीने एक छोटीशी मदत करण्यात आली.
आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आजच्या दिवसाचे महत्त्व जाणुन रुग्णांच्या नातेवाईकांना आज आमरस, पोळी, मसाले भात असा मेनू मोफत वाटप करण्यात आला. तसे तर 365 दिवस आस्थाच्या वतीने अन्नदान चालूच असते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 275 लोकांना अन्नदान करण्यात आले व सोलापुरातील आठ झोपडपट्ट्यांमध्ये गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ मीना गायकवाड, डॉ देविदास गायकवाड, संदीप खंडेलवाल, नीलिमा हिरेमठ, नीता अकुर्डे, अनिता तालीकोटी, आकाश तालिकोटी, छाया गंगणे, स्नेहा मेहता, पुष्कर पुकाळे, विजय छंचुरे हे सर्वजण उपस्थितीत होते. तर संपुर्ण नियोजन आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, पुष्कर पुकाळे आणि आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूर यांनी केले होते.