अनंत जाधव यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी, रिमांड होम मधील मुलींनी मागताच दिला 40 इंची टीव्ही

सोलापूर : प्रतिनिधी
78 व्या स्वातंत्र्य दिवसा निम्मित रेमांड होम येथे अनाथ 50 मुला मुलींना स्नॅक्स पाणी पुरी, भेळ, चटणी पुरी, चटणी पाव आपुलकी युथ फाउंडेशन च्या वतीनं देण्यात आले. या वेळेस प्रमूख उपस्थिती माजी नगरसेवक मार्गदर्शक अनंत जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख मनिष काळजे, या कार्यक्रमाचे आयोजक मल्लिकार्जुन संस्था बळवंत बिराजदार, सुनील लवटे, सचिन बारटक्के, दशरथ भोसले, गणेश शिंदे, धर्मराज कोळी, विश्वमत चे संपादक कबीर तांडोरे, मुश्रफ कोटकुंडे , संकेत गोटे,आपुलकी युथ फाउंडेशन चे मेहुल भुरे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नेत्यांची सामाजिक बांधिलकी आणि मुलींच्या चेहऱ्यावर हास्य
निरागस चेहऱ्याकडे पाहून सवयीप्रमाणे आणखीन समस्या विचारण्याचा मोह माजी नगरसेवक आनंत जाधव यांना आवरला नाही. यातील काही मुलांना आणखीन समस्या काय आहेत असे विचारले असता. काही मुलींनी समोर येऊन रिमांड होम मधील TV मधे बिघाड झाला आहे आपण ती समस्या सोडवू शकाल का? असे विचारल्यानंतर ताबडतोब अनंत जाधव यांनी नविनच 40 इंच TV order देऊन ताबडतोब Install करुन देण्यात आले. यावेळी येथील मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता.
भाजप नेते तथा माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्यातील सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा समोर आली असून त्यांनी डिमांड होम मधील मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खऱ्या अर्थाने 15 ऑगस्ट साजरा झाल्याचे समाधान व्यक्त केले.