सोलापूरमहाराष्ट्रसामाजिक
कै.सौ.रुपाली इंगळे यांचे दुःखद निधन
महेश इंगळे यांच्या पत्नी कै.सौ.रुपाली इंगळे यांचे पुण्यात उपचारादरम्यान झाले निधन

सोलापूर : प्रतिनिधी (अक्कलकोट)
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ.रुपाली इंगळे यांचे आज सायंकाळी ४:३० वाजता दीर्घ आजाराने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दिनांक ११/६/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता मानकरी वाडा, धाकटीवेस, मुरलीधर मंदिर शेजारी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कर्मचारी सेवेकरी यांच्या वतीने श्री.स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना.