महालक्ष्मी समोर हेमाडपंथी सजावट, दिलीप कोल्हे यांच्या घरातील डेकोरेशन पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी

सोलापूर : प्रतिनिधी
मागील 40 वर्षापासून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थाने गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत करण्यात येते. महालक्ष्मी समोर दरवर्षी विविध सजावट देखावे सादर करण्यात येतात त्या माध्यमातून समाज देखील करण्यात येते. यंदाच्या वर्षी भगवान शंकराचे हेमाडपंथी स्वरूपातील मंदिर सजावट केली आहे.
हे पाहण्यासाठी लक्ष्मी विष्णू चाळ सह सोलापूर शहरातील अनेक नागरिक कोल्हे यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत.
महालक्ष्मी समोर श्रावणी सोमवार, महादेवाचे मंदिर, शिवरायांचे गड किल्ले, अठरापगड जातींचे बारा बलुतेदार यांचा देखावा, पंढरपूरची वारी यासह विविध देखावे सादर केल्याची माहिती माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांनी दिली.
महालक्ष्मी समोर करण्यात येणारी संपूर्ण सजावट ही कोल्हे कुटुंबीयातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी मिळून करतात बाहेरील एक ही कारागीर वापरला जात नाही.
हे सर्व यशस्वी करण्यासाठी माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोनाली कोल्हे, रणजित कोल्हे, प्रियांका कोल्हे, पार्थ कोल्हे, विराज कोल्हे, गायत्री कोल्हे, विश्वजीत कोल्हे, यांनी परिश्रम घेतले. यावेळी घरातील सदस्य उपस्थित होते.