प्रभू श्रीराम, स्वामी समर्थांच्या अवमानाचा शहर भाजपतर्फे निषेध

सोलापूर : प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड (प्रवीण गायकवाड गट) च्या कार्यक्रमात प्रभू श्रीराम, स्वामी समर्थांचा अवमान झाल्याचा विरोधात शहर भारतीय जनता पक्षा तर्फे गुरुवारी निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेड (प्रवीण गायकवाड गट) च्या कार्यक्रमात हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवमान करण्यात आला. त्यावेळी स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही. अशा जातीयवादी, हिंदू धर्मविरोधी मानसिकतेचा भाजप सोलापूर शहराच्यावतीने दत्तनगर चौकात गुरुवारी जाहीर निषेध करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुरोहित कृष्णहरी क्यातम यांच्या हस्ते विधिवत स्वामी समर्थ, श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रभू श्रीराम, श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे घालण्यात आले.
याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्य, अक्षय अंजीखाने, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, उपाध्यक्ष जय साळुंखे, भूपती कमटम, प्रशांत फत्तेपूरकर, चिटणीस नागेश सरगम, अनिल कंदलगी, बजरंग कुलकर्णी, दत्तात्रय पोसा, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, देवेंद्र कोठे, वैभव बिराजदार, मनोज कलशेट्टी, जाकीर सगरी, आनंद बिरू, अंबादास बिंगी, रामचंद्र जन्नू , राजशेखर येमुल, नरेश पतंगे, विजय इप्पापाकाल, गिरीश बत्तुल, किरण भंडारी, राम वाकसे, सतीश महाले, राहुल घोडके, विशाल धोत्रे, विजय महिंद्रकर, धीरज कुंभार, शावर कोंडा, प्रकाश गाजुल आदी उपस्थित होते. यावेळी या शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.