मोहोळकरांनी सर्वाधिक लीड दिल्याने प्रणिती ताई कडून अपेक्षाही जास्त, सिमाताई पाटील यांनी मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदेना दिले निवेदन

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ शहर आणि तालुक्यातील मतदारांनी नेहमी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना भरभरून मत दिले. प्रत्येक वेळी जो कोणी खासदार निवडून येतो तो सोलापूर शहरांमध्येच लक्ष देतो ग्रामीण भागात लक्ष देत नाही. नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना मोहोळकरांनी सर्वाधिक लिड दिल्याने त्यांच्या अपेक्षाही उंचावले आहेत.
मोहोळ दळणवळण, व्यवसाय, शिक्षण, पर्यटन, यासाठी अत्यंत महत्त्वाचा रेल्वे मार्ग असून या विषयी उद्धव ठाकरें शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सिमाताई पाटील यांनी कामाला सुरुवात केली आहे. मोहोळ रेल्वे स्टेशन येथे यापूर्वी सिद्धेश्वर एक्सप्रेस, चेन्नई मुंबई एक्सप्रेस, सोलापुर मिरज या तीन गाड्यांना थांबा होता. कोरोना काळा पासून या गाड्यांचा थांबा बंद केला होता मोहोळ हे तालुक्याचे ठिकाण आहे मोहोळ शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर मोहोळ रेल्वे स्टेशन आहे. मोहोळची बाजारपेठ मोठी असून व्यापाऱ्यांना पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर, गदक या ठिकाणी व्यापाऱ्यांना जाण्यासाठी सोलापूर कुडूवाडी या रेल्वे स्थानकांवर जावे लागत आहे. त्यामुळे व्यापारी विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
ही गैरसोय दूर व्हावी यासाठी 12116 अप सिध्देश्वर, 12115 डाऊन सिध्देश्वर, 12158 सोलापुर-पुणे अप हुतात्मा एक्सप्रेस, 12157 पुणे-सोलापुर डाऊन हुतात्मा एक्सप्रेस, 22158 चेन्नई-मुंबई अप मेल एक्सप्रेस, 22157 मुंबई-चेनई डाऊन मेल एक्सप्रेस, 22155 कलबुर्गी- कोल्हापूर एक्सप्रेस, 22156 कोल्हापूर -कलबुर्गी एक्सप्रेस, 163 82 डाउन कन्याकुमारी- पुणे एक्सप्रेस, डाऊन कन्याकुमारी – पुणे एक्स्प्रेस ही गाडी संध्याकाळी 6 वाजता मोहोळ वरून पुण्या ला जाण्यासाठी उपयोगी आहे. या गाडीचा उपयोग दररोज सकाळी सिध्देश्वर ने जाऊन मोहोळ ते सोलापूर ये जा करण्यासाठी उपयोगी आहे. या मागण्यांचे निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सिमाताई पाटील यांनी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदनाद्वारे दिले आहे.
मोहोळकरांनी सर्वाधिक लीड दिल्याने आता अपेक्षाही जास्त.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे, ॲड शरद बनसोडे, जय सिद्धेश्वर महास्वामी अशी मान्यवर नेते मंडळी निवडून गेली आहेत. मतदारांनी त्यांना भरभरून सहकार्य केले मात्र मतदारांच्या पदरी निराशाच राहिली, मतदार संघातील साधे साधे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे मोहोळ विकासापासून कोसो दूर राहिले प्रत्येकाने आपला केवळ राजकारणासाठी वापर केल्याची भावना मोहोळ येथील मतदारांमध्ये आहे. मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकास साठी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून भरीव निधी आणि कामाची अपेक्षा देखील मोहोळकरांनी व्यक्त केली.