घरफोडी मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळुन 6 गुन्हे उघडकीस, 5 मोटरसायकल हस्तगत

सोलापूर : प्रतिनिधी
एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत होणाऱ्या घरफोडी व मोटरसायकल चोरांची माहिती काढुन, तसेच आरोपीतांचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करणेकामी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सुचना दिल्या होत्या. एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर हद्दीत सक्त पेट्रोलीग करुन, हस्ते पर हस्ते, बातमीदारांचे मदतीने कसोशीने घरफोडी करणाऱ्या व मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर कडील एकुण 06 गुन्हे उघडकीस आणुन एकुण 01 लाख 92 हजार रुपये किं. सोन्याचे दागीने, रोख रक्कम व 05 मोटर सायकल हस्तगत करण्यात आले आहे. एक मोटरसायकलचा पोलीस अभिलेख तपास करीत आहोत.
आरोपी शाहरुख ऊर्फ आलम महमद इसाक तांबोळी, दोन विधीसंघर्षग्रस्त बालक, सुर्यकांत येलगर, सैफन नुरुधीन बागवान, दोन बाल आरोपी ताब्यात असून इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पो.नि. विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, पोहेकों/ राकेश पाटील, नाना उबाळे, दिपक डोके, सचिन भांगे, पोना, मंगेश गायकवाड, पोकों/ आमसिध्द निंबाळ, दिपक नारायणकर, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, भारत तुक्कुवाले सुहास अर्जुन, अमोल यादव, अजीत माने, देविदास कदम, अमर शिवसिंगवाले यांनी पार पाडली.