गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी, घरफोडीचा १, चोरीचे ५ असे ६ गुन्हे शहर गुन्हे शाखेकडून उघड

सोलापूर : प्रतिनिधी
१० जून २०२४ रोजी गुन्हे शाखेकडील, सपोनि/जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकास, गोपनिय बातमी मिळाली की, एक इसम कमी किंमतीत टि. व्ही. विक्री करण्यासाठी, सलगर वस्ती परिसरातील चर्च जवळ येणार आहे. त्याअनुषंगाने, सपोनि/जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकाने, आरोपी नामे अनमोल आनंद जाधव, वय-२७ वर्षे, राहणार सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.०२ सोलापूर यास ताब्यात घेतले. त्यानंतर, त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये, त्याने त्याचा मित्र पाहिजे आरोपी नामे सचिन शिंदे याच्यासह एक टि.व्ही. आणि गणपतीची मुर्ती चोरी केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे, आरोपी नामे अनमोल आनंद जाधव याचे ताब्यातुन, टि.व्ही व गणपतीची मुर्ती असा एकुण ५६,२९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार, सलगर वस्ती पोलीस ठाणे गु.र.नं. ११४/२०२४ भा.दं.वि.सं. कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये, दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
०९ जून २०२४ रोजी, गुन्हे शाखेकडील, सपोनि/विजय पाटील व त्यांचे तपास पथकास मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने, आरोपी नामे-साहेबा उर्फ सोनू सतीश चव्हाण, यय-४१ वर्षे, रा.लोधी गल्ली, सोलापूर यास ताब्यात घेवून, त्याचेकडून, PORSCHE कंपनीची २,५१,०००/- रूपये किंमतीची चोरी केलेली सायकल जप्त केली आहे. त्यानुसार, सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर कडील गु.र.नं.४३२/२०२४ भा.द.वि.क.३७९ अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. त्याचप्रमाणे, सपोनि/विजय पाटील व त्यांचे तपास पथकास मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने, आरोपी नामे- बावू श्यामलाल कुकरेजा, वय-५५ वर्षे, रा. सोलापूर यास ताब्यात घेवून, त्याचेकडून, चोरीस गेलेली २०,०००/- रू. किंमतीची एक इलेकट्रीक सायकल जप्त केली आहे. त्यानुसार, सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर कडील गु.र.नं.४२६/२०२४ भा.द.वि.क. ३७९ अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
१२ जून २०२४ रोजी, गुन्हे शाखेकडील, सपोनि दादासो मोरे यांचे तपास पथकातील पोकों/इम्रान जमादार यांना, बातमी मिळाली की, ” नंबर प्लेट नसलेली शाईन कंपनीची मोटार सायकल चोरी केलेला इसम हा, सदरची मोटार सायकल घेवून, विक्रीकरीता रेवणसिध्देश्वर मंदीर, जुना विजापूर नाका या ठिकाणी येणार आहे.” प्राप्त बातमीचे आधारे, सपोनि/दादासो मोरे व त्यांचे तपास पथकाने, रेवणसिध्देश्वर मंदीर, जुना विजापूर नाका येथून, आरोपी नामे- रावजी विरप्पा माने, वय-४६ वर्षे, रा. घर नं-१०३१, न्यु पाच्छा पेठ, यलगंटी कॉम्प्लेक्स, अशोक चौक, सोलापूर यास ताब्यात घेतले. नमूद आरोपीकडे अधिक विचारपूस करता त्याने, होंडा कंपनीची शाईन मॉडेलची मोटार सायकल क्रमांक एम.एच.१३ सी.डी.८९३४ किंमत २५,०००/-ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार, सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर गु.र.नं.४३१/२०२४ भा.दं.वि.क.३७९ अन्वये, दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
तसेच, स.पो.नि./संदिप पाटील व त्यांचे तपास पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विजापूर नाका पो.स्टे. गुरनं ९१/२०२४ भादंवि ३८० या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल महिला नामे रेणुका जाधव ही वापरत आहे. त्यानुसार, महिला नामे रेणुका सुरेश राठोड, वय-३५ वर्षे, व्यवसाय-घरकाम, रा. ब्लॉक नं-४०, मंत्री चंडक, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर हिला ताब्यात घेवून, तिचे कब्जातुन, विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर गुरनं ९१/२०२४ भादंवि-३८० मधील पांढऱ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत रू.२५,०००/- हा जप्त करून, सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
०९ जून २०२४ रोजी, स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जेलरोड पो.स्टे. गुरनं-१२८४/२०२० भादंवि-३७९ या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल रेकॉर्डवरील आरोपी नामे विराज कांबळे हा वापरत आहे. त्यानुसार, आरोपी नामे- विराज हुसेनी कांबळे, वय-२५ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. १३६, कडबा बाजार जवळ, रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ, सोलापूर याचेकडे मोबाईल बाबत विचारपूस केली असता, त्याने सदरचा मोबाईल मार्केट यार्ड मधील एका वाहनातुन चोरी केल्याचे कबुल केले. त्याप्रमाणे जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर शहर गुरनं-१२८४/२०२० भादंवि-३७९ मधील काळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत रू.१५,०००/- हा जप्त करणेत आला आहे.
एकूण ०३,९२,२९०/- रूपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशा प्रकारे, शहर गुन्हे शाखेने घरफोडी चोरीसह चोरीचे एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणून सदरची कामगिरी, एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, अजित बोऱ्हाडे, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/विजय पाटील, सपोनि/जीवन निरगुडे, सपोनी/दादासो मोरे, सपोनि/संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.