सोलापूर जिल्हा वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांचे हस्ते संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25 निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वकिलांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 15 डिसेंबर 2024 रोजी शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांच्या हस्ते अगदी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भूषविले. सुरूवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशांनी करण्यात आले आणि त्यानंतर सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक स्नेह संमेलनाची परंपरा जुनी असल्याचे सांगून दरवर्षी अशाच प्रकारे विविध कला गुणदर्शन आणि खेळांचे स्पर्धा भरविले जाणे वकिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले व या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुके आणि सोलापूर शहरातून एकूण वीस वकिलांच्या क्रिकेट संघांनी सहभाग घेतल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या हस्ते उपस्थित तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षांचे आणि सहभागी 20 संघांच्या कर्णधारांचे स्वागत पर सत्कार करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. आझमी साहेबांनी सोलापूर बार असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेच्या उपक्रमाचे आणि एकंदरीत वकिलांच्या हिताच्या कार्यक्रमाचे कौतुक करून वकिलांना त्यांच्या कामामुळे उद्भवणाऱ्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी खेळ हे एकमेव माध्यम असल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी त्यांच्या अध्यक्ष भाषणात ते स्वतः एक स्टेट लेव्हलचे क्रिकेटर असून क्रिकेट हा खेळ शारीरिक आरोग्यासाठी अतिशय चांगले असून यात नेतृत्वगुण आणि समूहाने काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. वकिलांसारख्या असोसिएशन मध्ये देखील त्यांच्या व्यस्त जीवनात अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याने सोलापूर बार असोसिएशनचे कौतुक केले आणि सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमात बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सोपान शिंदे, मोहोळ क्रिकेट संघाचे कर्णधार ॲड. रमेश पाटील, युनिक एडवोकेट्स क्रिकेट संघाचे कर्णधार ॲड. रियाज शेख, यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन म्हणजे वकिलांसाठी एक विरंगुळा असून नेहमीच्या धावपळीच्या जीवनातून सुटका मिळत असल्याचे सांगून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व बार असोसिएशनचे आभार देखील मानले.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष न्हावकर, मुंबई हायकोर्टचे विधिज्ञ ॲड. विक्रांत फताटे, एसीपी श्री. माने साहेब आणि चडचणकर ट्रॅव्हल्स चे श्री जगदीश चडचणकर यांची प्रमुख उपस्थिती
होती.
सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असो अध्यक्ष ॲड. अमित व्हि. आळंगे, उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज नागेश पामूल, सहसचिवा ॲड. निदा अनिस सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार सि. कटारे सह सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड मनोज पामुल व आभार प्रदर्शन ॲड. विनयकुमार कटारे यांनी केले.