तळे हिप्परगा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन

सोलापूर : प्रतिनिधी
मौजे तळे हिप्परगा वीरभद्र नगर येथे माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शिफारशीने व सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमार्फत जन सुविधा योजना (जिल्हा वार्षिक योजना 2023=2024) अंतर्गत शिवप्पा बेऴै घर ते सुरेखा काळे घर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या आदेशाने सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आले.
यावेळी वीरभद्र नगरातील रहिवासी यांनी पावसाळ्यात फार अडचणी येत होत्या येण्या जाण्यासाठी फार त्रास होत होता परंतु आता रस्ता झाल्यामुळे समाधान वाटत आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवप्पा बेळै, सागर काळे, दीपक देशमुख, ज्योतिबा पवार, पांडुरंग शेंडगे, कुलदीप पवार, चेतन चौधरी, चंद्रकांत चौगुले, विनोद शिंदे, गणेश हौशेट्टी, नागराज हौशेट्टी, ग्रामसेवक गणेश नारायणकर आदी उपस्थित होते.