राज्यात देवेंद्र आणि सोलापूर शहर मध्य मध्ये देवेंद्र पाहिजे, असे म्हणत विवेक घळसासी यांनी देवेंद्र कोठे यांना दिले आशीर्वाद

सोलापूर : प्रतिनिधी
महायुतीचे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांनी व्याख्याते विवेक घळसाशी यांचा शुभ आशीर्वाद घेतला यावेळी बोलताना देवेंद्र कोठे म्हणाले,
महाराष्ट्रभर प्रख्यात ‘अमृतवक्ते’ म्हणून ओळख असलेल्या, राष्ट्रभक्ती आणि धर्मनिष्ठेचे प्रेरणादायी तेजस्वी विचार मांडणारे विवेकजी घळसासी यांचा आशीर्वाद मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि शुभ संकेतांची घटना आहे. अध्यात्मिक प्रवचनातून समाजजागृती करणारे घळसासी सर, अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना दिशा देणारे प्रतिभावान विचारवंत आहेत. भाजपा महायुतीच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभेची अधिकृत उमेदवारी मला जाहीर झालेल्या विजयासाठी त्यांचे आशीर्वाद मिळाले, हे मी माझे भाग्यच समजतो.
घळसासी सरांचा व्याख्यानांच्या निमित्ताने सोलापूर दौरा होता आणि प्रशांत बडवे काकांच्या मार्गदर्शनाने ही शुभंकर परिणामांची भेट साधता आली. सरांनी मला शुभाशीर्वाद देताना माझ्या कार्याचा गौरव केला आणि पुढील यशासाठी प्रेरणा दिली. त्यांनी मतदारांना राष्ट्रहितासाठी एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन करताना म्हटले की, ‘आता राज्यात देवेंद्र पाहिजे, आणि शहर मध्य मध्ये पण देवेंद्रच पाहिजे. त्याकरिता जात, भाषा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीच्या भेदभावाला बळी न पडता राष्ट्रहितासाठी आपण एकत्र आले पाहिजे.’
सध्या नागपुरात वास्तव्यास असणारे निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे सोलापूरमध्ये असंख्य अनुयायी असून घळसासी सरांनी माझ्याबद्दल काढलेल्या गौरवोद़्गारांमुळे सोलापुरातील तेजस्वी विचारांच्या राष्ट्रभक्त, सुजाण आणि सतर्क नागरिकांच्या मतांचे दान माझ्या पारड्यात पडेल, याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहोत, आणि येत्या 20 तारखेला मतपेटीतून तो आशीर्वाद व्यक्त होवो, हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना असे मत देवेंद्र राजेश कोठे म्हणाले.