शिवसेनेचा 25 नगरसेवकांचा प्रस्ताव भाजपने केला मान्य, शिंदे-देशमुख एकत्र, अमोल शिंदे यांच्या प्रयत्नाला यश

सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभेमध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ सुटावा यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि सहकारी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मागणी केली होती परंतु महायुतीतील भाजपने ती जागा सोडली नाही ती स्वतःकडे ठेवली.
आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सोलापूर शहरातील 26 प्रभागांमध्ये एक उमेदवार याप्रमाणे 26 नगरसेवक उमेदवारांची मागणी भाजपकडे केली होती. भाजपने ती मान्य केली नव्हती आणि मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकारी शिवसैनिकांना न्याय मिळत नसल्याने, भाजपला धडा शिकवण्यासाठी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शहर प्रमुख मनोज शेजवाळ, युवा सेनेचे अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाकडून शहर उत्तर, मध्य, दक्षिण विधानसभेत उमेदवारी दाखल केली.
याचा फटका भाजपला बसणार हे लक्षात आल्यानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली अखेर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या शिवसैनिकांसाठी केलेल्या मागणीला यश आले. उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजप नेते अनंत जाधव यांनी शिवसेनेला नगरसेवक निवडणुकीत 25 जागा देण्याचे मान्य केले. एकंदरीतच सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वाद क्षमला असल्याचे पहावयास मिळाले.
शिवसेनेच्या वतीने भरण्यात आलेले स्वराज्य पक्षाकडून चे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बोलणे झाल्याची माहिती देखील अमोल शिंदे यांनी दिली.