
सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य इरफान शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले यांनी नोटीस दिली आहे त्यात त्यांनी असे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी हे राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार यांचा प्रचार करत आहेत असे असताना तुम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार यांचा प्रचार करतानाचा व्हीडिओ सोशल मिडीयात फिरत असून यामध्ये आपण काँग्रेसचे उमेदवाराला मतदान करून निवडून देण्याचे आवाहन करीत प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे. हे कृत्य राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशा विरोधात आणि पक्षाच्या ध्येय धोरणा विरोधात असून पक्ष शिस्तीचे उल्लंघन झालेले दिसुन येत आहे.
जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या सुचनेनुसार आपणावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असून आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? याचा लेखो खुलासा ही नोटीस आपणास मिळाल्या पासुन २४ तासाच्या आत लेखी खुलासा सादर करण्यात यावा. उत्तर वेळेत न आल्यास आपणास आपण केलेले शिस्तभंग मान्य आहे असे गृहीत धरून आपणवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशी नोटिस देण्यात आली आहे. इरफान शेख कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरनार आहे.