मराठा समाजाचा OBC तून आरक्षण देऊ नये, वेगळे आरक्षण द्यावे, कोणी केली मागणी..

सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक पिढ्यांपासून धनगर समाज हा मेंढपाळीसाठी शेख्या-मेंढ्या घेवून भटकंती करून उदरनिर्वाह करत स्वतःचे कुटुंब सांभाळत आहे. समाजाचे अनेक प्रश्न व त्यांच्या चालीरिती, परंपरा, संस्कृती विभिन्न समाज हा अतिमागास असल्यामुळे असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अनुसूचित जमातीच्या सुवीमध्ये ३६ च्या क्रमांकावर धनगर समाजाला S.T. मध्ये नोंद घटनेत केलेली आहे.
तरी देखील गेल्या ७० वर्षापासून वारंवार आंदोलने, निदर्शने, मोर्चे असे अनेकप्रकारे आंदोलन करून सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाने समाजाच्या आरक्षणाचा (अंमलबजावणीचा) प्रश्न मार्गी लावला नाही. सध्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी बारामतीमध्ये धनगर समाजाचे उपोषण सोडवत असताना पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाचा S.T. अंमलबजावणीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देवून उपोषण सोडविले, परंतु सत्ता येवून सुद्धा कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नसल्याच दिसून आले.
धनगर समाजाच्या युवकांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे. तरी त्वरीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावाला अन्यथा सरकारच्या विरोधा मध्ये समाजातील विविध संघटना यांच्यावतीने मंत्र्यांच्या गाड्या अडविणे, मुख्यमंत्र्यांना बांगड्यांचा आहेर, ठिकाठिकाणी रास्ता रोको, मंत्र्यांना जिल्हाबंदी, मंत्र्यांना काळे फासणे तसेच मतदानावर बहिष्कार अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या घटनादत्त अधिकारासाठी मोठा लढा उभारणार आहोत. तरी त्वरीत अंमलबजावणी करावी. तसेच महाराष्ट्रामध्ये सुरू असलेले ओबीसी आंदोलन लक्ष्मण हक्के यांचे उपोषास मुख्यमंत्री व मंत्रीमंडळातले मंत्री यांनी भेट घेवून उपोषण सोडवावे. अन्यथा सदरच्या आंदोलनामध्ये होणाऱ्या परिणामास तुम्ही व तुमचे सरकार हे जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाक्के यांची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यांच्या जीवीतास कोणताही धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या सरकारवर असेल. अशा आशयाचे निवेदन संघर्ष सेनेच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले.
यावेळी संघर्ष सेनेचे प्रमुख शेखर बंगाळे, गौरव पवार, संदीप धायगुडे, रनजीत मळगे, वैभव येरमाने, वाघमोडे मॅडम, आदींसह युवक उपस्थित होते.