सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

डॉ किरण देशमुख यांच्या नेतृत्वात भाजपचे आंदोलन, नाना पटोलेच्या प्रतिमेस चिखलमारत दिल्या घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे चिखलाने माखलेले पाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून त्याच्या हाताने धुऊन घेऊन तमाम सामाजिक व पक्षीय कार्यकर्त्यांचा अपमान केला. काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक देण्याची परंपरा कायम ठेवली आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीतर्फे कन्ना चौक येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेला चिखलमार आंदोलन केले.

भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजयुमो अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजप नेते व कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंच्या पोस्टरला चिखल मारत बघतोस काय रागान चिखल खाल्लाय नानानं, मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पटोले मुर्दाबाद, नाना पटोलेचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, धिक्कार असो धिक्कार असो नाना पटोलेचा धिक्कार असो, अशा निषेधाच्या घोषणा देऊन कन्ना चौक परिसर दणाणून सोडला.

या निषेध आंदोलनप्रसंगी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, माजी सभागृह नेता संजय कोळी, युवा मोर्चा सरचिटणीस रवि कोटमाळे, सिध्दार्थ मंजेली, श्रीनिवास करली, वैभव हत्तुरे, राजु पाटील, दत्तु पोसा, अजित गायकवाड, गौतम कसबे, देविदास बनसोडे, शेखर फंड, समर्थ होटकर, श्रीपाद घोडके, माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीकांचना यन्नम, वंदना गायकवाड, स्वाती आवळे, विजयालक्ष्मी गड्डम, राधिका पोसा, विमल पुट्टा,

राहुल शाबादे, नागेश येळमेली, नरेंद्र पिसे, राहुल घोडके, नवनाथ सुरवसे, विशाल शिंदे, निलेश शिंदे, विरेश उंबरजे, आनंद बिरू, नागेश सरगम, प्रतिक आडम, अमोल झाडगे, प्रवीण कांबळे, जगन्नाथ चव्हाण, संतोष बंडगर, शेखर ईराबत्ती, श्रीनिवास दायमा, चंद्रकांत तापडिया, विजय बंमगोडे, पवन आलुरे यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!