भाजप दक्षिणच्या आंदोलनाची चर्चा, महेश देवकरांच्या पुढाकाराने नाना पटोलेंच्या फोटोस जोडे मार आंदोलन

सोलापूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुजोर वृत्तीचा व कृत्याचा आमदार सुभाष देशमुख व युवा नेते मनीष देशमुख यांच्या नेतृत्वा खाली दक्षिण सोलापूर वतीने जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोलेंनी कार्यकर्त्याकडून पाय धुऊन घेण्याच्या मुजोर कृत्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, महिला आघाडी, दक्षिण भाजपाच्या वतीने नाना पटोलेंच्या प्रतिकात्मक फोटोस् जोडे मार आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चा शहर सरचिटणीस महेश देवकर, भाजपा महिला अध्यक्ष शितोळे ताई, दक्षिण सोलापूर संपदाताई जोशी, पाटोळे ताई, भाजपा दक्षिण सोलापूर युवा मोर्चा शहर चिटणीस ओंकार जाधव, युवा मोर्चा उपाध्यक्ष अंबादास पामू, विधानसभा प्रमुख विशाल बनसोडे,
भाजपा युवा मोर्चा मंडल अध्यक्ष डोंगरेश चाबुकस्वार, परमेश्वर माळगे, लक्ष्मीकांत बिराजदार, मधुसूदन जंगम, अंबादास जाधव, राहुल वाघमोडे, नागेश येरनाले, मनीष गंजणारकर आदि उपस्थित होते.