राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना मराठा आंदोलकांनी विचारला जाब

सोलापूर : प्रतिनिधी
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे याचे प्रमुख खासदार अमोल कोल्हे हे विविध ठिकाणी जात आपल्या पक्षाची भूमिका मांडत आहेत सोलापुरातील मोहोळ या ठिकाणी शिवस्वराज्य सभा संपल्यानंतर सोलापूर कडे रवाना होताना मराठा बांधवांनी खासदार अमोल कोल्हे यांना अडवले आणि त्यांना मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
यावेळी 100 % पाठिंबा आहे असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. परंतु मराठा आंदोलन खासदार अमोल कोल्हे यांचं ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. मराठा आंदोलक म्हणाले, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत त्याकडे लक्ष द्या, आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करा असे म्हणत एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या. यावेळी मराठा बांधवान समवेत खासदार अमोल कोल्हे यांनीही एक मराठा लाख मराठा च्या दिल्या घोषणा.