समाजसेवक कै.शिवाप्पा गायकवाड यांच्या 11 वी पुण्यतिथीनिमित GK मागासवर्गीय संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
समाजसेवक कै. शिवाप्पा नागप्पा गायकवाड यांच्या 11 वी पुण्यतिथीनिमित् GK मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा शिबिराचे आयोजन निराळे वस्ती जुनी पोलीस लाईन या ठिकाणी आयोजित केले होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी SRP चे अधिकारी दत्तात्रय कोळी, ज्ञानेश्वर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिबिरास मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. जी के मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी शिबिरा विषयी माहिती देऊन संजय गांधी योजनेतील निराधार महिलांना सुद्धा या योजनेत समाविष्ट करून घेण्याकरिता जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देऊन लवकरात लवकर या सर्व महिला भगिनींना या योजनेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार आहे.
या शिबिरास महिला भगिनी सुनिता बडवणे, पौर्णिमा गायकवाड, शोभा शिंदे, पद्मिनी लोखंडे, छाया बाबर, अनिता धडके, जना मिसाळ, रेखा लकडे, संगीता ठाकूर, यास्मिन शेख, शाबिरा शेख, रुकसाना निसार, महानंदा यादव, पल्लवी लामतुरे, पूजा पवार, छाया शिंदे, अरुणा कदम, सुनिता लोखंडे आधी महिला भगिनी उपस्थित होत्या व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चव्हाण गजानन पाटील यांनी केले.