साहित्य भारती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी युवा लेखक अहमद शेख यांची निवड, स्टँड अप कवी कट्टा एक यशस्वी कार्यक्रम.

सोलापूर : प्रतिनिधी (पुणे)
साहित्य परिषद पुणे शाखे तर्फे स्टँड अप कवी कट्टा या कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 20 ते 22 कवींनी कविता सादर केल्या. रसिक श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली. याच कार्यक्रमात पुणे महानगराची 2024 -25 या वर्षा साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रा.डॉ. वर्षा तोडमल यांची पुणे महानगर अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. तसेच महानगर मंत्री डॉ. चारुदत्त गंधे, महानगर मंत्री प्रा. स्वामिनी मोरे, महानगर संयोजक शशांक महाजन यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या.
त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. उमा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणुन युवा लेखक अहमद शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रांत उपाध्यक्षपदी प्रा.डॉ. अरुण ठोके (नाशिक), प्रा. बिराजदार (सोलापूर ) यांची निवड करण्यात आली. विस्तारित कार्यकारिणी लवकरच घोषित केली जाईल. महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री नितीन केळकर यांनी या वर्षीची कार्यकारिणी घोषित केली.
डॉ. अनुजा कुलकर्णी आणि प्राचार्य श्याम भुरके यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.विसुभाऊ बापट यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.